कणकवली (प्रतिनिधी) : गोवा बनावटीची दारू गैरकायदा, बिगर परवाना ताब्यात बाळगलेल्या स्थितीत आढळल्याप्रकरणी रामचंद्र दत्ताराम तांबे (५८, फोंडाघाट हवेलीनगर) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने फोंडाघाट – हवेलीनगर येथे संशयिताच्या राहत्या घरानजीक असलेल्या बागेत बुधवारी दुपारी ३.१० वा. सुमारास केली. यामध्ये १२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कारवाईत एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू जामसंडेकर, हवालदार सदानंद राणे, आशिष गंगावणे, जॅक्सन घोन्साल्वीस, किरण देसाई आदी सहभागी झाले होते.












