Breaking News

पालकमंत्री नितेश राणेंना दिवीजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांकडून आशिर्वाद

असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात आली. या सेवेबद्दल दिविजा वृध्दाश्रम संस्थेचे संदेश शेट्ये यांनी आभार मानले. तसेच दिवीजा वृध्दाश्रमातील आजी-आजोबांकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यासह महाराष्ट्राची विकासात्मक सेवा करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या निमित्ताने आशिर्वाद देण्यात आले. तसेच यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी, पुढील वाटचालीत यश समृध्दी लाभण्यासाठी ईश्वर चरणी असलदे ग्रामस्थांनी प्रार्थना केली.

यावेळी पंचायत समिती सभापती हर्षदा वाळके, सरपंच चंद्रकांत डामरे, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, सोसायटी चेअरमन भगवान लोके, भाजपा सरचिटणीस पंढरी वायंगणकर, उपसरपंच सचिन परब, व्हाईस चेअरमन दयानंद हडकर, उपाध्यक्ष रघुनाथ लोके, कमलेश पाटील, भाजपा युवामोर्चा शक्तीकेंद्रप्रमुख प्रविण डगरे, माजी तंटामुक्त समिती अध्यक्ष बाबाजी शिंदे, राजू तांबे, व्यवस्थापक संदेश शेटये आदींसह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.