Breaking News

भाषणाच्या सुरुवातीलाच नारायण राणे झाले भावुक

कणकवली (प्रतिनिधी) : आयुष्यात अनेक भाषणे केली. महाराष्ट्र, देशाच्या सभागृहात काम केलं. अनेकांच्या भाषणांना, प्रश्नांना, टीकेला उत्तर दिली. परंतु आज उपस्थित मान्यवरांनी केलेल्या भाषणाला उत्तर देऊ शकत नाही. अनेक नेत्यांना भेटण्याचा योग आला. भाषणाच्या सुरुवातीलाच खासदार नारायण राणे हे भावुक झाले.

राजकारणात येताना कोणता संकल्प करून आलो नाही. आयुष्यात निर्धार, मेहनतीची जोड दिली तर सर्व शक्य आहे. मी आणि हऱ्या दोघेही एक हार घेऊन बाळासाहेबाना हार घालायचो. आज भाजपात आहे. जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन मिनिटात सांगितले दादा आता भाजपामध्ये या. मी मोठा असलो तरी ज्या पदावर कोण असेल तर त्याला मान देतो. सुनील तटकरे आपल्याबद्दल भरभरून बोलले. त्यांच्या मुलाला शरद पवारांनी तिकीट दिली. होतकरू तरुण राजकारणात येत असल्याने त्यांना मदत करत निवडून आणले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य आत्मसात करणे आजच्या तरुणांना गरज आहे. मी पदासाठी कधी काम केले नाही. मी कधी पदे मागितली नाही. बाळासाहेबांनी बोलवून दिली आहेत. आजच्या नेत्यांची भाषणे पाहून माझी दोन्ही मुले आत्मसात करतील, आणि अशीच प्रगती करतील असे सांगत नारायण राणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.