Breaking News

फोंडाघाटात गोवा बनावटीच्या दारूवर धाड

७ हजार ५०० रुपयांचा माल जप्त

कणकवली (प्रतिनिधी) : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सिंधुदुर्गच्या पथकाने ७ मार्च रोजी फोंडाघाट-फोंडातिठा येथे हुंबरट रोडनजीक छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत सूर्यकांत सुभाष शेळके (वय ४२, रा. फोंडाघाट) याच्याकडून ७,५०० रुपये किमतीच्या एकूण ६० सीलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत.

बेकायदेशीर दारू बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र जामसांडेकर, हवालदार आशिष गंगावणे आणि किरण देसाई यांच्या पथकाने केली आहे.