बारावी निकालात एस. एम. ज्युनिअर कॉलेजची उल्लेखनीय कामगिरी

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, एस. एम. ज्युनिअर कॉलेज, कणकवलीने यंदाही समाधानकारक यश संपादन केले आहे.

महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल ९५ टक्के लागला असून, वाणिज्य शाखेचा निकाल ८६ टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. तसेच एमसीव्हीसी विभागाचा निकाल ७९.०७ टक्के लागला आहे. महाविद्यालयाचा एकूण सरासरी निकाल ८७.५७ टक्के इतका लागला आहे.
या यशाबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचे, प्राध्यापकांचे व पालकांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.