बांद्यात श्री बांदेश्वर चरणी अभिषेक
प्राथमिक आरोग्य केंद्रात बेडशीट व फळे वाटप
बांदा (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांद्यात विविध कार्यक्रम संपन्न झालेत. यानिमित्त प्रथम स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात खा. नारायण राणे यांच्या दीर्घायुष्यी व निरोगी आरोग्यासाठी अभिषेक करण्यात आला. तसेच बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे व बेडशीट वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई, उपसरपंच रत्नाकर आगलावे, माजी उपसरपंच जावेद खतीब, देवस्थान समिती अध्यक्ष बाळू सावंत, ग्रा. पं सदस्य श्याम मांजरेकर, माजी सरपंच दीपक सावंत, माजी पं. स. सदस्या राखी कळंगुटकर, गुरुनाथ सावंत, राजा सावंत, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, साई धारगळकर, सुनील धामापूरकर, राकेश केसरकर, गुरु धारगळकर, राजा सावंत, विकी कदम, निलेश कदम, युवक अध्यक्ष साई सावंत डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, स्वप्नील सावंत, वाफोली उपसरपंच विनेश गवस, रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे आदी उपस्थित होते.













