कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील शिवशक्तीनगर येथील पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी लिकेज झाली आहे. परिणामी शनिवार, ११ एप्रिलला शहरातील शिवशक्तीनगर, जळकेवाडी, नगरपंचायत ऑफीस लाईन, हर्णे आळी, तेलीआळी, बस स्टँड लाईन, विद्यानगर, बांधकरवाडी, परबवाडी, शिवाजीनगर, नाथ पै नगर, कनकनगर, शिवशक्तीनगर, साईनगर, वरचीवाडी, या परिसरातील पाणीपुरवठा बंद राहील. नागरिकांनी याची नोंद घ्यावी व घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.












