जिल्हाधिकारी कार्यालय समोर उद्या सकाळी 8 वाजता उपोषण छेडणार….
अशाप्रकारे नाहक त्रास होत असलेल्या नागरिकांनी उपोषणाला हजर राहण्याचे आवाहन
कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बनावट कागदपत्रांच्या आधारे सरकारी सेवेत भरती झाल्याचा गंभीर आरोप समोर आला असून, या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्ते श्री. जयप्रकाश वसंत कदम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनानुसार, आचिर्णे ग्रामसेवक महीला श्रीम. सविता भिमराव काळे उर्फ सविता लक्ष्मण हांडे यांच्याबाबत वैभववाडी तालुका येथुन अनेक तक्रारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे करुन व त्याबाबत पुरावे सादर करुनही मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी टाळाटाळ व नागरीकांना बेजाबदारपेण उद्धट वक्तव्य करुन अपमानास्पद बोलुन संबंधित ग्रामसेवक महीला व यांना संगणमत असलेले त्यांचे पती श्री. लक्ष्मण हांडे विस्तार अधिकारी यांनी संगणमताने ३ अपत्य असल्याबाबत लपविले. व अपंग असल्याचा खोटा दाखला घेवुन शासन सेवेत घुसखोरी केली. या प्रकरणात अनेक तक्रारी असूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
तसेच, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकऱ्या मिळवल्या जात असल्याने स्थानिक तरुणांमध्ये बेरोजगारीचे संकट अधिक तीव्र होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अयोग्य वागणूक दिली जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, अनेक तक्रारी प्रलंबित ठेवणे, सुनावणीसाठी तारखा देऊनही कामकाज न करणे, तसेच नागरिकांना वारंवार त्रास देणे अशा प्रकारांमुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. संबंधित प्रकरणात दोषी आढळणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून कमी करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी उद्या सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात येणार आहे.
दरम्यान, या गंभीर आरोपांमुळे जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, आता या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तरी ज्या लोकांना अशाप्रकारे नाहक त्रास होत असेल त्यांनी उद्या होत असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळी आठ वाजता उपस्थिती दर्शवावी असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क जयप्रकाश कदम 9373267561












