सावित्रीबाई फुले महिला मंडळ ओझरम यांचा प्रेरणादायी कार्यक्रम
तळेरे (स्वप्नील तांबे) : सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या वतीने ओझरम येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून कवयित्री संध्या तांबे तसेच ओझरमच्या सरपंच समृद्धी राणे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ११.०० वाजता पूजा-पाठाने झाली. त्यानंतर प्रमुख पाहुण्या कवयित्री संध्या तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी जागतिक महिला दिनाचे महत्त्व सांगत महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक सहभाग वाढवावा असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला सरपंच समृद्धी राणे, ग्रामसेविका पाटील मॅडम, ग्रामअधिकारी जाधव साहेब तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती दीपिका दिलीप तांबे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती तुषार तांबे यांनी केले. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी संगिता पाटील मॅडम, ग्रामपंचायत सदस्य दिलीप तांबे तसेच महिला मंडळाच्या पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये एस. के. तांबे, सुदेश तांबे, तुषार तांबे, स्वाती तांबे, स्वप्नाली तांबे, अंकिता तांबे, तनिषा तांबे, अदिती तांबे, लावण्या तांबे, कामिनी तांबे, शुभांगी तांबे तसेच इतर महिला व ग्रामस्थ सहभागी झाले होते.
महिलांच्या सन्मानासाठी आणि समाजातील त्यांचे योगदान अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला.




















