सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आमचा निर्णय झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. फक्त पत्रकारच अजून त्या मूडमध्ये नाहीत. आम्ही प्रत्येक जण स्वबळावर निवडणुका लढण्याचा तयारीला लागलेले आहोत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये दोन्ही पक्षांची तुल्यबळ ताकद आहे. शिवसेना-भाजप मध्ये युती करून आम्ही बंडखोरीला का प्रोत्साहन देऊ उबाठाकडे निवडणुका लढविण्यासाठी उमेदवारच नाहीत. महाविकास आघाडीची उमेदवार उभे करण्याची क्षमता नाही. त्यामुळे महायुती मैत्रीपूर्ण निवडणूक लढवेल आणि निवडणुकीनंतर एकत्र सत्ता स्थापन करेल. दोन्ही पक्षांची स्वबळाची तयारी आहे त्यामुळे आम्ही कामाला लागलो आहे.
ऑन उदय सामंत शिंदे गटाची ताकत दाखवणार
उदय सामंत यांना ताकद दाखवायची इच्छा असेल तर ती त्यांनी दाखवावी. आम्हाला देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि राणे साहेब काय बोलतात हे आमच्या साठी महत्वाचे आहे. या संदर्भात आमची प्रदेश कार्यालयात बैठक झाली आहे. भांड्याला भांड लावणं आमचं काम नाही. जनतेला कोण किती भांडते याच्याशी संबध नाही. जनतेला विकास हवा आहे. आमच्या नेत्यांचा निर्णय झाला आहे त्यानुसार आमचा कार्यकर्ता कामाला लागला आहे. आम्हाला आमच्या नेत्यांनी स्वबळावर निवडून लढण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार आम्ही कामाला लागलो आहोत.
ऑन अवकाळी पाऊस शेती नुकसानी
या संदर्भात पंचनामे सुरू आहेत. पंचनाम्याच्या माध्यमातून सर्व माहिती घेण्याचे काम सुरू आहे. भात पीक नुकसानीचा आढावा घेतल्या नंतर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जाईल. फळपीक विम्याची 90 कोटी रक्कम 43 हजार शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी वाटप झाली आहे.












