ओझरम येथे पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 ला उत्साहात शुभारंभ; क्रिकेटप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कणकवली (स्वप्निल तांबे) : कणकवली तालुक्यातील ओझरम येथे ओझरम क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पंचक्रोशी प्रीमियर लीग 2026 या भव्य क्रिकेट स्पर्धेचा आज सकाळी उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
ग्रीन पार्क मैदान, ओझरम येथे रंगलेल्या या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला स्थानिक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

सरपंच समृद्धी राणे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर राणे, सदस्य दिलीप तांबे, गावचे पोलीस पाटील तुषार तांबे, तसेच नारायण गुरव, भास्कर गुरव, अरविंद राणे, सुधीर राणे, संतोष राणे, मिलिंद तांबे, रोहित राणे, विक्रांत मेस्त्री, जयप्रकाश गुरव, समीर तांबे, तुषार तांबे, डेव्हिड तांबे आणि दीपक कुंभार आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सुधाकर राणे यांनी श्रीफळ वाढवून स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला.

या दोन दिवसीय स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली असून उद्या अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे. परिसरातील विविध संघांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत असून मैदानावर क्रिकेटचा जल्लोष पाहायला मिळत आहे.
स्पर्धेत प्रथम क्रमांकासाठी ₹५,५५५ तर द्वितीय क्रमांकासाठी ₹३,५५५ अशी आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. याशिवाय उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, सामनावीर आणि मालिकावीर अशा विविध गटांतही विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.

ओझरम गावात सध्या क्रिकेटचा उत्सवच रंगला असून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. उद्याच्या अंतिम सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.