कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई आणि शाखा कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सवाचे कणकवली बुद्ध विहार येथे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता पंचशील ध्वजारोहण डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळाला पुष्पाहार. अभिवादन शिल्प अनावरण. समता शब्दशिल्प अनावरण. स्वच्छतागृहाचे उद्घाटन.
सकाळी १०.३०वाजता बुद्ध वंदना पूजापाठ. सकाळी ११. ००वाजता स्वागत आणि सत्कार. कार्यक्रमाचे अध्यक्ष रुचीरा जाधव.( कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई) प्रमुख पाहुणे मा. श्री संदेशजी पारकर (नगराध्यक्ष नगरपंचायत कणकवली) विशेष उपस्थिती मा. आयु. रोहिता तांबे (समाज कल्याण सभापती)मा. श्री सुशांत नाईक ( उपनगराध्यक्ष नगरपंचायत कणकवली)मा. गौरी पाटील (मुख्याधिकारी नगरपंचायत कणकवली)मा. आयु. लुकेश कांबळे ( नगरसेवक नगरपंचायत कणकवली)मा.आयु. दीपिका जाधव ( नगरसेविका नगरपंचायत कणकवली)मा. आयु. गौतम खोडकर (माजी नगरसेवक)मा. आयु. शामराव जाधव (अध्यक्ष दी बुद्धिस्ट फेडरेशन सिंधुदुर्ग)मा. आयु. परशुराम कदम ( उपाध्यक्ष क. ता. बौ. वि.सं. मुंबई)मा. आयु. भाई जाधव (तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कणकवली) मा. आयु. वासुदेव तांबे(सचिव क. ता.बौ. वि. सं. मुंबई)मा. आयु. अंकुश कदम (क. ता. बौ. वि. सं. मुंबई. शाखा कणकवली)सायंकाळी६.००वाजता प्रश्न मंजुषा. रात्री ७. ३० स्नेहभोजन रात्री ९.००वाजता जाहीर प्रबोधन सभा
प्रमुख वक्त्या राही श्रुती गणेश.
रात्री १०.०० भिम जयंतीचा सांस्कृतिक जल्लोष. या कार्यक्रमा साठी बहू संख्येने उपस्थित राहून या जयंती महोत्सवाला यशस्वी करावे, असे आवाहन कणकवली तालुका बौद्ध विकास संघ मुंबई शाखा कणकवली यांस कडून करण्यात येत आहे.












