ओरोस (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील नामांकित डॉन बॉस्को स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजने यंदाच्या बारावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाला यशाची जोड मिळाल्याने संस्थेचा निकाल पुन्हा एकदा उज्ज्वल ठरला आहे.
यावर्षीच्या निकालात विशेष म्हणजे टॉप ३ मध्ये मुलींनी बाजी मारत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सायन्स शाखेतून सोनम तुषार काळसेकर (80.67) द्वितीय ईश्वरी चंद्रकांत अरवारी (79.17) तृतीय तन्वी परशाराम गावडे (75.33) यांनी उत्कृष्ट गुणांसह यश संपादन करत संस्थेचा मान उंचावला आहे.
तसेच वाणिज्य शाखेतूनही विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत उत्कृष्ट निकाल नोंदवला आहे. वाणिज्य शाखेतून प्रथम शुभ्रा युगल किशोर प्रभूगावकर (94.83) प्रथम, यारसी योगेश तारी (93.17) द्वितीय, सना जावेद मेमन (92.67) तृतीय संस्थेचे प्राचार्य, शिक्षकवर्ग आणि पालकांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून यशस्वी विद्यार्थी व संस्थेचे कौतुक होत आहे.












