कणकवली (प्रतिनिधी) : ओझरम ग्रामपंचायत आणि उपविभाग देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय डाक विभागामार्फत भव्य आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३ जून २०२६ आणि ४ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत ओझरम येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये ५ वर्षांखालील मुलांचे नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्डमध्ये मोबाईल क्रमांक लिंक करणे, बायोमेट्रिक अपडेट करणे तसेच नाव, पत्ता आणि जन्मतारीख यांसारख्या माहितीतील दुरुस्त्या करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन आधार कार्डासाठी मुलाचा जन्म दाखला तसेच आई किंवा वडिलांपैकी एकाचे आधार कार्ड आवश्यक राहणार आहे. आधार दुरुस्तीसाठी जुने आधार कार्ड आणि आवश्यकतेनुसार पूरक कागदपत्रे सोबत आणावीत, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामपंचायत ओझरम आणि उपविभाग देवगड यांच्या वतीने करण्यात आले आहे.













