Breaking News

खारेपाटण प्रा.आ.केंद्रात राष्ट्रीय पल्स पोलिओ चा शुभारंभ

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दि.२८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या सौ प्राची ईसवलकर यांच्या शुभहस्ते एका छोट्या बालकाला पोलिओ डोस देऊन करण्यात आला.

         यावेळी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रिया वडाम, डॉ.सागर तरटे,खासगी वैद्यकीय अधिकारी डॉ.उमेश बालन,अशा स्वयंसेविका गतप्रवर्तक श्रीम. संकिता पाटणकर तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. "एकही बालक पोलिओ लसीकरणा मध्ये चुकणार नाही याची दक्षता सर्व आरोग्य कर्मचारी वर्गाने घ्यावी. तसेच या राष्ट्रीय उपक्रमास नागरिकांनी सहकार्य करावे.असे आवाहन यावेळी जि.प. सदस्या सौ प्राची ईसवलकर यांनी केले."

       खारेपाटण प्रा.आ.केंद्राच्या अंतर्गत येणारे सर्व गावामध्ये एकूण १८ बूथ कार्यरत ठेवण्यात आले होते.तर प्रा.आ.केंद्राच्या वतीने  संपूर्ण खारेपाटण शहरात विविध ठिकाणी एकूण ६ पोलिओ बूथ लसिकरांसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. यामध्ये खारेपाटण बसस्थानक,खारेपाटण चेकपोस्ट, खारेपाटण रेल्वे स्टेशन,खारेपाटण हायस्कूल,शिवाजीपेठ खारेपाटण, संभाजीनगर टाकेवाडी येथे पोलिओ लसीकरणासाठी बूथ कर्मचारी वर्गसह सज्ज ठेवण्यात आले होते.ही पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका,आरोग्य कर्मचारी यांनी सहकार्य केले.