संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांतर्गतलाभ 17 प्रकरण मंजूर

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तहसिलदार यांच्या दालनात नवनियुक्त तालुका स्तरीय संजय गांधी योजना समितीची बैठक संपन्न झाली. अलिकडेच जिल्हयाचे पालक मंत्री ना. नितेशजी राणे यांच्या शिफारसीने देवगड तालुका स्तरीय संजय गांधी योजना समिती गठीत करण्यात आलेली आहे. या समितीच्या अध्यक्ष पदाची धुरा शिरगांचे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद विठ्ठल साटम यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. या समितीत अशासकिय सदस्य म्हणून दिलीप शांताराम वाडेकर रा. वाडा, श्रीमती शुभांगी विठ्ठल राणे रा. दहिबांव, श्री. मनोज विजय जाधव रा. हिंदळे, श्री. रामचंद्र गणपत कोकरे रा. वाघीवरे, श्री. सुहास दिपक राणे रा. कुवळे, श्री. भालचंद्र भिवा मांजरेकर रा. उंडिल, श्री. वैभव यशवंत करंगुटकर रा. वाडातर, श्री. उदय धोंडू पाटील रा. फणसगांव, श्री. प्रकाश राजाराम राणे रा. हडपिड, शासकिय प्रतिनिधी सदस्य म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती देवगड, मुख्याधिकारी नगरपंचायत देवगड आणि सदस्य सचिव म्हणून तहसिलदार देवगड अशी चौदा सदस्यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.

नवनियुक्त समितीच्या वतीने दि. ०४ नोव्हेंबर रोजी देवगड तहसिलदार यांच्या दालनात बैठक संपन्न झाली. तहसिलदार रमेश पवार यांनी समितीचे अध्यक्ष मिलिंद साटम यांचे पुष्प गुच्छ देवून स्वागत केले. तसेच संजय गांधी नायब तहसिलदार यांनी सर्व सदस्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत केले. या बैठकित विधवा निराधार योजनेचे तीन, दिव्यांग योजनेचे सात व श्रावणबाळ योजनेंतर्गत सात असे एकूण सतरा प्रस्ताव मंजूर करण्यात आले. मंजूर लाभार्थ्यांमध्ये योगिता गणपत परब रा.इळये, सायली संदेश लोके रा. लिंगडाळ, सुरेखा संतोष कदम रा. जामसंडे, शुभम मुकेश तांबे रा. मुटाट, नामदेव धोंडू घाडी रा. मुटाट, ओवी तुषार सावंत रा. वळीवंडे, सिध्देश संतोष फाळके रा. विरवाडी, चंदना विजय राणे रा. वरेरी, प्रतिक विजय राण रा. वरेरी, रमेश श्रीधर घाडी रा. चांदोशी, बाळकृष्ण सिताराम पुजारे रा. नाद, राजाराम गोपाळ तेली रा. मुटाट, रेश्मा रामदास लोके रा. लिंगडाळ, गोविंद तुकाराम पुजारे रा. कोटकामते, भिकाजी विठोबा शिंगाडे रा. वरेरी, शंकर कृष्णा सोमले रा. गोवळ, मंगेश धोंडू धुरी रा. चांदोशी आदी लाभार्थ्यांना संजय गांधी योजना व श्रावणबाळ योजनांतर्गतलाभ मंजूर करण्यात आला आहे. या बैठकिची सांगता नायब तहसिलदार श्री. खरात यांनी उपस्थितांचे आभार मानून केली.