Breaking News

शिष्यवृत्ती परीक्षेत न्यू इंग्लिश स्कूल कसालचे उल्लेखनीय यश

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था संचलित न्यू इंग्लिश स्कूल, कसाल या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष अवधूत मालणकर, संस्थेचे संचालक, सर्व विश्वस्त, मुख्याध्यापक मळगांवकर सर, पर्यवेक्षिका सौ बालम मॅडम तसेच सर्व शिक्षकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या परीक्षेत ग्रामीण सर्वसाधारण गटातून कु. जगन्नाथ रामचंद्र परब कु. पियुष भिकाजी पारकर आणि कुमार दिप रामचंद्र वनकर यांनी उल्लेखनीय यश मिळवून शाळेचा गौरव वाढविला.

या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले. या यशामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षांविषयी आत्मविश्वास वाढला असून भविष्यातही अशाच प्रकारचे उज्ज्वल यश संपादन करण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.