कणकवली (प्रतिनिधी) : फोंडाघाट येथे स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने छापा टाकून १० हजार ३०० रु. किमतीची गोवा बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त केली. याप्रकरणी पावलू बस्त्याव पिंटो (२८, रा. फोंडाघाट) याच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. कारवाई वरिष्ठांच्या सूचनेनुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार आशिष गंगावणे, ज्ञानेश्वर तवटे, किरण देसाई, कणकवली पोलीस ठाण्याचे सुभाष शिवगण, कॉन्स्टेबल स्वप्नील जाधव यांनी केली.













