पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन
नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा : प्रमोद रावराणे
वैभववाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे व विद्यमाने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या बी. के. एल. बालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. २३ जून रोजी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
हे शिबिर सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत प्राथमिक आरोग्य केंद्र, उंबर्डे येथे होणार आहे. कोळपे जि. प. सदस्य प्रमोद रावराणे यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरामध्ये विविध आजारांवरील तपासणी तसेच शस्त्रक्रियांसाठी पात्र रुग्णांची निवड करण्यात येणार आहे.शिबिरात अँजिओप्लास्टी, कर्करोग शस्त्रक्रिया, पित्ताशयातील खडे, कान-नाक-घसा शस्त्रक्रिया, बायपास सर्जरी, मुतखडा, प्रोस्टेट ग्रंथी, मोतीबिंदू, हर्निया, महिलांचे गर्भाशयाचे आजार, थायरॉईड शस्त्रक्रिया, मणक्यावरील दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अपेंडिक्स, मूळव्याध, स्तनामधील गाठी, हायड्रोसिल तसेच इम्प्लांट रिमुव्हल यासारख्या शस्त्रक्रियांचा योजनेंतर्गत लाभमिळणार आहे.
याशिवाय जनरल सर्जन, स्त्रीरोग तज्ज्ञ, जनरल फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि नेत्ररोग तज्ज्ञ यांच्यामार्फत रुग्णांची तपासणी केली जाणार आहे. या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजक तथा जिल्हा परिषद सदस्य व जनआरोग्य समिती प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डेचे अध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी केले आहे.













