Breaking News

जाणवली बौद्ध विकास संघाचे प्रमुख सल्लागार धर्माजी पवार यांचे निधन; उद्या अंत्ययात्रा

कणकवली (प्रतिनिधी) : जाणवली बौद्ध विकास संघ, मुंबई येथील सर्व सभासदांना अत्यंत दुःखद बातमी देण्यात येत आहे की, संघटनेचे प्रमुख सल्लागार आयु. धर्माजी गणपत पवार यांचे आज दिनांक २६ मार्च २०२६ रोजी दुपारी २:०० वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे.


त्यांच्या निधनामुळे संघटनेत तसेच सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळाली होती. मुंबई आणि ग्रामीण विभागातील जाणवली बौद्ध विकास संघाच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात येत आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या सकाळी १०:०० वाजता त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.


📍 पत्ता :
A1, सिद्धार्थ नगर, भीमशक्ती चौकासमोर, शिवसेना शाखेजवळ, ठाणे पूर्व
अधिक माहितीसाठी संपर्क : ९९२०३६९३२९