खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान खासदार नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त दि. १० एप्रिल २०२६ रोजी भरतोय जनता पार्टी खारेपाटण व खारेपाटण ग्रामपंचायत च्या वतीने विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते रमाकांत राऊत व खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव यांनी संयुक्तिक प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. यावेळी जि.प.सदस्या प्राची ईसवलकर यादेखील उपस्थित होत्या.
कोकणचे भाग्य विधाते खासदार नारायण राणे यांचा वाढदिवसा खारेपाटण येथे भाजप पक्षाच्या वतीने साजरा करण्यात येणार असून यानिमित्ताने भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिर व मोफत चष्मा वाटप व रुग्णांना डोळ्याची मोफत शास्त्रीयेसाठी सहकार्य करण्यात येणार आहे. तसेच खारेपाटण मधील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खाऊ वाटप करण्यात येणार आहे. याबरोबरच खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राला अत्यावश्यक असणारा (मेडिसीन किट) औषध पुरवठा रुग्णासाठी करण्यात येणार आहे.
खारेपाटण एस टी बस स्थानक शेजारी श्री कोळसुलकर कॉम्प्लेक्स येथे हा कार्यक्रम संपन्न होणार असून खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित आयोजित करण्यात आलेल्या या आरोग्य शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन खारेपाटण भाजप पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.












