बांदा (प्रतिनिधी) : खासदार नारायण राणे चषक बांदा या भव्य क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन समारंभ उद्या बुधवार दिनांक ८ रोजी सकाळी ठीक ९ वाजता जिल्हा परिषद अध्यक्ष मा. प्रमोद कामत यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला आघाडी भाजप जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवराज लखमराजे भोसले, बांदा सरपंच प्रियांका नाईक, मंडळ अध्यक्ष मधुकर देसाई आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थित उद्घाटन समारंभ होणार आहे.
एक गाव एक संघ या नियमानुसार या स्पर्धेत संघ सहभागी होणार आहेत. मा. खासदार नारायण राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्वानी या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंच्यायत सदस्य जावेद खतीब व राजाराम उर्फ बाळू सावंत यांनी केले आहे.












