Breaking News

भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन; गगनगिरी महाराजांच्या आशिर्वादाने धार्मिक उत्सवाची पर्वणी

रत्नागिरी (प्रतिनिधी) : विश्वगौरव विभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या पवित्र आशिर्वादाने स्वामी गगनगिरी सेवा मंडळ, रत्नागिरी यांच्या वतीने गुरुवार, दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी श्री दत्त मंदिर, तळेकांटे येथे भव्य सत्संग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सकाळी श्री दत्तात्रेयांवर अभिषेक, श्री सत्यनारायण महापूजा व होम-हवन भंडारा होणार आहे. दुपारच्या सत्रात भाविकांसाठी महाप्रसाद तसेच महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी श्रीक्षेत्र गगनगड येथील निर्गुण पादुकांचे आगमन व स्वागत सोहळा पार पडणार असून “भक्ता घरी गगनगिरी” या नामस्मरण सत्संगाने वातावरण भक्तिमय होणार आहे. रात्री हरिपाठ, आरती, प्रवचन आणि महाप्रसाद असे विविध कार्यक्रम होणार आहेत.

या सोहळ्यात उल्हासगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, संजयसिंह पाटणकर, बापूसाहेब पाटणकर, रमेशदादा माने, अशोक इंगळे आणि राम पानगले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तसेच आदिनाथ मंडळ, करबुडे व श्री महालक्ष्मी भैरीभवानी नमन मंडळ यांच्या वतीने “त्रिपुरासुर वध” या धार्मिक देखाव्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या भव्य धार्मिक सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बाळू जानू झोरे यांनी केले आहे.