तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे–वैभववाडी मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका बैलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बैलाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बैल गंभीर जखमी झाला असून तो रस्त्याच्या कडेला कोसळला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी बैलाला मदत करण्याचा प्रयत्न केला. संबंधित यंत्रणेला घटनेची माहिती देण्यात आली असून जखमी बैलावर उपचार करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे वाहनचालकांनी तळेरे–वैभववाडी मार्गावर वाहन चालविताना वेगावर नियंत्रण ठेवावे आणि विशेषतः जनावरे रस्त्यावर आढळल्यास अधिक काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिकांकडून करण्यात येत आहे.













