देवगड (प्रतिनिधी) : देवगडहून जामसंडेच्या दिशेने दुचाकीने घरी परतत असताना गायीला धडक बसल्याने मिलिंद शामराव घाडी (४०, मूळ रा. तळवडे-देवगड, सध्या रा. जामसंडे) हा गंभीर जखमी झाला. ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.













