नारायण महादेव तांबे यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन
कणकवली (प्रतिनिधी) : बेळणे खुर्द बौद्ध विकास मंडळ मुंबई शाखा बेळणे खुर्द चे माजी सचिव, नांदगाव विभागाचे माजी अध्यक्ष व बौद्धाचार्य आणि कणकवली तालुका बौद्ध विकास संघ शाखा कणकवली चे विद्यमान उपाध्यक्ष सुनील तांबे यांचे वडील नारायण महादेव तांबे यांचे काल दुपारी २:३० वाजता वयाच्या 95 व्या वर्षी दुःखद निधन झाले. कणकवली तालुका बौद्ध विकास संघ शाखा कणकवलीचे विद्यमान उपाध्यक्ष सुनील तांबे यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 10:30 वाजता बेळणेखुर्द येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.












