सावंतवाडी (प्रतिनिधी) : जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा तळवणे नं. १ च्या शाळेत विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने सीडबॉल अर्थात बीजगोळे तयार करणे हा उपक्रम राबविला.
या शाळेतील इयत्ता १ ली ते ७ वी च्या सर्व ४५ विद्यार्थ्यांनी जवळपास ८० सीडबॉल तयार करून ते शाळेजवळील जंगल भागात फेकले. या सिडबॉलसाठी फणस, काजू, चिंच इ. च्या बिया वापरण्यात आल्या.
सीडबॉल तयार करण्याचे प्रात्यक्षिक शाळेतील शिक्षिका मनिषा राऊळ यांनी प्रात्यक्षिकासह दाखविले. या उपक्रमासाठी मुख्याध्यापक युवराज गोसावी, उपशिक्षक बापुशेट कोरगांवकर व पालक यांचे सहकार्य लाभले.
या उपक्रमाचे आरोंदा केंद्राच्या केंद्रप्रमुख स्नेहल मुळे, आजगाव प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी गावीत यांनी कौतुक केले.













