Breaking News

जीवन प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने ओझरम येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप

कणकवली (प्रतिनिधी) : सन्मा . श्री बाळा राणे ( ओझरम माळवाडी ) यांच्या माध्यमातून जीवन प्रबोधिनी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष सन्मा . श्री . सत्यवान नर साहेब यांच्याकडून ओझरम नं . १, ओझरम पश्चिम व ओझरम मापार वाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आले. तसेच दहावी , बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व बक्षिस देण्यात आले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते सन्मा . श्री . बाळा राणे ( माळवाडी ) , निवासी संकुल दक्षता समिती अध्यक्ष सन्मा . श्री . एल . डी . राणे , ग्रामपंचायत सदस्य सन्मा . श्री . सुधाकर राणे , माजी सैनिक सन्मा . श्री . वसंत राणे , शा .व्य . स . माजी अध्यक्ष सन्मा . श्री रामचंद्र बिर्जे , सन्मा . श्री . सुरेश देसाई, शा . व्य . स . उपाध्यक्ष सन्मा . सौ . अपर्णा अमित राणे , माजी विद्यार्थी संघ उपाध्यक्ष सन्मा . सौ . सान्वी सुरेश खरात व शाळेचे मुख्याध्यापक श्री . विनायक जाधव हे उपस्थित होते.

सन्मा . श्री सत्यवान नर साहेब यांच्या शैक्षणिक योगदानाबद्दल व प्रशालेला शै . साहित्य उपलब्ध करून देणारे सन्मा . श्री . बाळा राणे यांचे शाळा व्यवस्थापन समिती व शाळेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले .