पळसंब गावचे माजी उपसरपंच सुहास सावंत यांचे निधन..!

आचरा (प्रतिनिधी) : पळसंब गावचे माजी उपसरपंच व देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुहास सहदेव सावंत ( 35 वर्षे ) यांचे उपचारादरम्यान खाजगी हॉस्पिटल येथे निधन झाले. उपसरपंच असताना शासनाच्या विविध योजना गावात राबवण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता. पळसंब देवस्थान ट्रस्ट विश्वस्त म्हणून झालेली निवड त्यांच्या कार्यकर्तृत्वाची साक्ष होती. रिक्षाव्यवसायिक असल्याने त्यांचा जनसंपर्क सुद्धा दांडगा होता. सदैव सर्वांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या सुहास सावंत यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात आई, तीन बहिणी, काका, काकी असा परिवार आहे.श्री जयंतीदेवी सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ, भारतीय जनता पार्टी मालवणच्यावतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.