“आजच्या युवकांनी व्यवसायभिमुख शिक्षणातून आपला विकास साधावा” – श्रीम.प्रतिभा चव्हाण
खारेपाटण (संतोष पाटणकर) : आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाचा स्वीकार करून आपला विकास साधावा. असे भावपूर्ण उदगार जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग च्या अधिकारी श्रीम.प्रतिभा चव्हाण यांनी खारेपाटण हायस्कुलचे लिपिक तथा द्विस्तरीय व्यवसाय अभ्यासक्रमाचे कर्मचारी श्री अनिलकुमार श्रोधर करंगुटकर यांच्या सेवापूर्ती सदिच्छा समारंभात मार्गदर्शन करताना काढले.
खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यावतीने खारेपाटण हायस्कूल ज्युनियर कॉलेज व द्विस्तरिय व्यवसाय अभ्यासक्रमाचे कार्यालयीन कर्मचारी तथा वरिष्ट लिपिक श्री अनिलकुमार करंगुटकर हे सेवा ज्येष्ठतेनुसार ३६ वर्षे प्रदीर्ग सेवेनंतर वयाच्या ५८ व्या वर्षी खारेपाटण हायस्कूल शिक्षण संस्थेतून सेवा निवृत्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खारेपाटण येथे सेवापूर्ती सदिच्छा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा कार्यक्रम खारेपाटण हायस्कूलचे चे वरिष्ठ शिपाई श्री जगन्नाथ रसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
या कार्यक्रमाला खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे,उपाध्यक्ष भाऊ राणे,सचिव श्री महेश कोळसुलकर,खारेपाटण महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए डी कांबळे,खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज चे प्राचार्य श्री संजय सानप पर्यवेशक श्री संतोष राऊत,रोटरी क्लब ऑफ खारेपाटण चे अध्यक्ष श्री दयानंद कोकाटे, राजापूरच्या माजी नगराध्यक्ष शीतल पटेल,माजी उपनगराध्यक्ष सुधा चव्हाण,डॉ.सर्वेश नारकर, उंडील पोलिस पाटील श्रीम.नर, दीपाली गोडकर,अणसुरे हायस्कूल मुख्याध्यापक श्री संजय मांडवकर, श्री घोडकर सर,खारेपाटण हायस्कूलचे ग्रंथपाल श्री यशवंत रायबागकर यांसह श्री करंगुटकर सर यांचा मित्र परिवार तसेच त्याची पत्नी व दोन चिरंजीव आपल्या कुटुंबासहित या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी खारेपाटण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज आणि शिक्षण संस्थेच्या वतीने श्री करंगुटकर सर यांचा सपत्नीक संस्थेचे अध्यक्ष श्री प्रवीण लोकरे यांच्या शुभहस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन विशेष जाहीर सत्कार करण्यात आला.यावेळी संस्थेच्या सर्व विभागाच्या शिक्षकांचा वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.व त्यांच्या भावी वाटचालीस अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
“ज्या संस्थेने माझ्या कठीण परिस्थीत मला आधार दिला मला आर्थिक, प्रापंचिक,कौटुंबिक व सामाजिक स्थैर्य प्राप्त करून दिले.ज्यांनी मला गेल्या ३६ वर्षात सांभाळून घेतलं त्या संस्थेचा मी कायम ऋणी असेन.आज मी जरी सेवा निवृत्त होत असलो तरी आपले प्रेम व आठवणी जिव्हाळा कायम राहील असे भावपूर्ण उदगार सत्कार मूर्ती श्री अनिलकुमार करंगुटकर सर यांनी आपल्या सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना काढले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खारेपाटण ज्युनियर कॉलेजच्या शिक्षिका श्रीम. दर्शना पाताडे मॅडम यांनी केले तर प्रास्ताविक पर्यवेशक श्री संतोष राऊत यांनी केले व सर्वांचे आभार प्रशालेचे शिक्षक श्री रामदास कापसे यांनी मानले.













