Breaking News

बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ४ एप्रिलला सराव सीईटी परीक्षेचे आयोजन

बांदा (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे बारावी पीसीएम गटाच्या विद्यार्थ्यांसाठी एमएचटी-सीईटी सराव परीक्षा २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. खऱ्या परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना आपली तयारी तपासता यावी या उद्देशाने ही परीक्षा घेतली जात आहे. परीक्षेचा पेपर विषय तज्ज्ञांनी तयार केलेला असून तो महत्त्वाच्या प्रश्नांवर आधारित असेल.

सराव परीक्षा नियमित सीईटी पद्धतीप्रमाणेच होणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेचा अनुभव मिळेल. यामुळे वेळेचे नियोजन आणि आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. परीक्षा शनिवार दि. ४ एप्रिल रोजी होणार असून नावनोंदणी निःशुल्क आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ९६०४२७२५६६ किंवा ९४०५७५१६४१ या क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन कॉलेजतर्फे करण्यात आले आहे.