वैभववाडी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा वैद्यकीय अधिक्षक डॉ.नरोटे यांनी केले आवाहन
वैभववाडी (प्रतिनिधी) : विशेष सहाय्य योजनेतील ज्या लाभार्थ्याकडे UDID ( Unique Disability ID card) नाही असे बहुतांश लाभार्थी हे मोठ्या प्रमाणात दिव्यांग असून त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन कार्ड काढणे हे दिव्यांग प्रवर्गातील लाभार्थ्यांना शारीरिक व आर्थिक दृष्ट्या परवडणारे तसेच शक्य नसलेने अशा लाभार्थ्यांचे UDID कार्ड हे तालुकास्तरावर शिबिर घेऊन दिव्यांग लाभार्थी यांची पडताळणी करण्यासाठी शिबिरे आयोजित केली आहेत त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ पर्यंत ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दिव्यांग लाभार्थी पडताळणी शिबिर आयोजित करण्यात आलेले आहे. तसेच सदर शिबिरामध्ये तालुक्यातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांची पात्र अपात्र बाबत तपासणी देखील करून घेण्यात येणार आहे.
सदर शिबिरा पूर्वी ज्या लाभार्थ्याकडे UDID कार्ड नाही, अशा लाभार्थ्यांची नोंदणी ऑनलाईन पोर्टलवर होणे आवश्यक आहे. तरी या शिबिराचा वैभववाडी तालुक्यातील सर्व दिव्यांग बांधवानी लाभ घ्यावा असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक डॉ. नरोटे अर्जुन यांनी केले आहे.












