Breaking News

वैभववाडी कॉलेजचे प्राध्यापक आणि नामवंत कवी ड्रॉ. नामदेव गवळी यांचे निधन

,वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख, नामवंत कवी आणि सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथील रहिवासी प्रा. डॉ. नामदेव गवळी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते 58 वर्षांचे होते. कॉलेजला जाण्यासाठी घरातून बाहेर पडले असता त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तत्पूर्वी त्यांचे निधन झाले होते. डॉ. नामदेव गवळी यांचा भातालय हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. या काव्यसंग्रहाला यापूर्वी प‌द्मश्री नामदेव ढसाळ, सुहासिनी इर्लेकर, यशवंतराव चव्हाण, राशीवडेकर, श्रीस्थानक, डॉ. मेणसे, भि.ग. रोहमारे, धामणसकर, व-हाडरत्न, कुसुमाग्रज, मोहिनीराज, कोमसाप आदी पुरस्कार प्राप्त आहेत. या काव्यसंग्रहातील त्यांच्या कवितांचा समावेश मुंबई विद्यापीठ द्वितीय वर्ष कला, शिवाजी विद्यापीठ स्वायत्त विवेकानंद कॉलेज येथे बी.ए. प्रथम वर्ष कला शाखेच्या अभ्यासक्रमात करण्यात आला आहे.प्रा. गवळी यांच्या अचानक निधनाने सर्व स्तरातून हळहळ व्येक्त करण्यात येत आहे.