मालवण (प्रतिनिधी) : मुंबई-ठाणे येथे झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत मालवण येथील सौ. श्वेता पंकज पेडणेकर यांच्या ज्ञानदा अॅक्टिव्हिटी सेंटरच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. नित्यानंद मयुर मुरकर याने ‘बी’ गटातून प्रथम क्रमांक मिळवत्त सुवर्णयश मिळविले. श्रीनिका निखील नागवेकर हिने तृतीय क्रमांक पटकावला. भूमी भूषण चव्हाण हिने चौथा क्रमांक चव्हाण व योजना वराडकर यांनी मिळविला. ‘ए’ गटातून हर्षाली चौथा क्रमांक मिळविला. ‘डी’ गटातून पार्थ चव्हाणने चौथा, ‘टी’ गटातून प्रिशा थोरात हिनेही चौथा क्रमांक पटकावला. सावंतवाडीत पहिल्या फेरीत बुर्वांश आळवे, युवराज साळसकर, युक्ता मेस्त्री, रिया पाटील, चार्वी टेंबुलकर व विघ्नेश माणगावकर यांनी ‘रिजनल अचिव्हर्स’ ट्रॉफी मिळविली.












