कोंडये येथे मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्तः दोन तास राबवली मोहीम

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून गावातील काही रस्ते प्लास्टिक मुक्त करण्यात आले आहेत. या मोहिमेमध्ये स्वच्छता मिशनचे अनेक स्वच्छता प्रेमी व ग्रामस्थ सहभागी झाले होते.

आरोग्यासाठी अनेक नागरिक मॉर्निंग वॉक करत असतात. हे मॉर्निंग वॉक करत असताना ज्या रस्त्याने मॉर्निंग आपण करतो तो रस्ता सुद्धा स्वच्छ करता येऊ शकतो ही संकल्पना स्वच्छता प्रेमी पत्रकार गणेश जेठे यांनी पुढे आणली आहे. श्री जेठे हे गेली पाच-सहा वर्ष सकाळी मॉर्निंग वॉक करताना आपल्या कोंडये गावातील रस्त्यांच्या बाजूला असलेला प्लास्टिक कचरा नेहमी उचलतात. त्यामुळे काही रस्ते नेहमी प्लास्टिक मुक्त असतात.

रविवारी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहिमेला गती आणि प्रेरणा देण्यासाठी अनेक स्वच्छता प्रेमी सहभागी झाले होते.

कोंडये आणि करंजे या गावांच्या हद्दीवर या मोहिमेला प्रारंभझाला. या मोहिमेची संकल्पना आणि उद्दिष्ट पत्रकार गणेश जेठे यांनी सांगितले. त्यानंतर स्वच्छता प्रेमी नायब तहसीलदार दिलीप पाटील यांनी मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहिमेचे महत्त्व सांगितले. हरकुळखुर्द चे माजी उपसरपंच संजय रावले यांनीही आपले मनोगत व्यक्त करून आपल्या हरकुळखुर्द गावातही अशी स्वच्छता मोहीम राबवणार असल्याचे सांगितले.

जिल्हा परिषदेचे आदर्श शिक्षक आणि कोंडये गावचे सुपुत्र विद्याधर तांबे यांनी देखील या मोहिमेत सहभागी होऊन मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहिमेमुळे आरोग्य आणि स्वच्छता या हे दोन्ही उद्दिष्ट साध्य होतात असे सांगितले.

या मोहिमेमध्ये माझी पंचायत समिती सदस्य महेंद्र डीचवलकर, पत्रकार सचिन राणे, विनायक पाताडे, पत्रकार तुषार नेवरेकर, प्रा. शेख, स्वच्छता प्रेमी विजय जामदार, अशोक पेडणेकर, अभिजीत लोके, कोंडये गावचे माजी सरपंच दिगंबर मेस्त्री, माजी सरपंच अनिल मेस्त्री, प्रदीप फोपे, रोहित मोंडकर, दर्वेश परब, सिद्धेश मोंडकर, राजन धोपटे अनिकेत जेठे, निलेश मेस्त्री, प्रथमेश मेस्त्री, प्रवीण मेस्त्री, अनुज जेठे, प्रकाश तेली, अमित आंबेरकर, पुंडलिक लाड, तृप्ती लाड, व इतर ग्रामस्थ आणि स्वच्छता प्रेमी सहभागी झाले होते. तसेच पाठिंबा दिला. यासाठी कोंडये गावातील मुंबईकर चाकरमानी श्री मधुकर जोईल यांनी टी-शर्ट पुरविले. तर चहा पाण्याची व्यवस्था आदर्श शिक्षक विद्याधर तांबे यांनी केली.