कणकवली येथील एस के डान्स अकॅडमीतर्फे “डान्स वर्कशॉप २०२६” प्रवेश सुरू !

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील एस के डान्स अकॅडमीतर्फे “डान्स वर्कशॉप २०२६” चे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हिप हॉप, बॉलीवूड, फ्रीस्टाईल आणि कंटेम्पररी अशा विविध नृत्यशैली शिकण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे या प्रशिक्षणाद्वारे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबतच त्यांना व्यावसायिक पातळीवर मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय मंचावर सादरीकरणाची संधीही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

या कार्यशाळेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे पाच अनुभवी आणि उत्कृष्ट नृत्यदिग्दर्शकांकडून प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यामुळे सहभागी विद्यार्थ्यांना नवीन तंत्र आणि शैली शिकण्याची उत्तम संधी मिळणार आहे.

ही कार्यशाळा २० एप्रिल ते ४ मे २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत पहिली बॅच, तर सायंकाळी ४ ते ६ या वेळेत दुसरी बॅच होणार आहे. कार्यशाळेसाठी शुल्क १००० रुपये निश्चित करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे ठिकाण व्ही मॉल, झेंडा चौकजवळ, बाजारपेठ रोड, कणकवली येथे आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी ७५०७८८५६६९ या क्रमांकावर संपर्क साधावा.