वैश्विका कदम हिचे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत यश

मालवण (प्रतिनिधी) : उमाबाई बर्वे ग्रंथालय देवगड च्या वतीने, विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत, संत राऊळ महाराज महाविदयालय कुडाळची विद्यार्थिनी, कु. वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून अभिनंदनीय सुयश प्राप्त केले आहे.

स्पर्धेत एकूण १३ स्पर्धाकांनी सहभाग घेतला. यावेळी कु. वैश्विका कदम हिस, ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. गुरुदेव परुळेकर, माजी मुख्याध्यापक- संजीत राऊत, साहित्यिका- सौ. अनुराधा दिक्षित, आदी मान्यवरांच्या हस्ते, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.

कु. वैश्विका कदम हिच्या या सुयशाबद्दल, संत राऊळ महाविद्यालय, कुडाळ च्या प्राचार्य, डॉ. स्मिता सुरवसे, विभाग प्रमुख – डॉ. दयानंद ठाकुर, इत्यादी सर्व प्राध्यापकांनी अभिनंदन केले आहे.