Breaking News

माडखोल धवडकी येथे ‘एक गाव एक संघ’ क्रिकेट स्पर्धा

सावंतवाडी (प्रतिनिधी) : केसरी धनगर समाज यांच्यावतीने शनिवार, ७ व ८ मार्च रोजी माडखोल धवडकी चिले मैदान येथे ‘एक गाव एक संघ’ मर्यादित भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चषक-२०२६ या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेत १६ संघांना प्रवेश देण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ३५ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक २१ हजार रुपये आणि आकर्षक चषक तसेच बक्षिसे व चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी जनार्दन लांबर ९७६४०४५४०१ आणि प्रकाश पाटील यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विलास जंगले आणि संदीप पाटील यांनी केले आहे.