कणकवली (प्रतिनिधी) : महाऍग्री कंपनीच्या ‘महाशक्ती ‘या वानाचा पिक पहाणी कार्यक्रम शुक्रवारी १७ ऑक्टोबर रोजी सकले खोल, आरवली -शिरोडा येथे पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेताच्या बांधावर नेऊन प्रगतशील शेतकरी अशोक मंत्री यांनी पिकवलेल्या महाशक्ती या वानाचा प्लॉट दाखवण्यात आला तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची व समस्यांचे निराकरण कार्यक्रमाचे पांडुरंग ऍग्री सातारा चे श्री विठ्ठल वरक यांनी केले. कार्यक्रमाला शिरोडा गावाच्या कृषी सहाय्यका श्रीमती देऊलकर यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले व महाअँग्री सिड्स कंपनीच्या ‘पिक पहाणी कार्यक्रम या उपक्रमाचे कौतुकही केले.महाशक्ती हे १३५ ते १४० दिवसात येणारे,चिखलाच्या जमिनीला उत्यंत उपयुक्त असे सुपर फाईन प्रकारातले भात वाण असून विशेषतः खाण्यासाठी अत्यंत चविष्ट आहे.
वानाची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असल्यामुळे चांगली रोगप्रतिकारक क्षमता व उत्पन्नाला चांगले असल्यामुळे शेतक-यांनीही या वानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढवावे असे आवाहन कंपनीचे सेल्स मॅनेजर प्रथमेश वरक यांनी शेतकऱ्यांना केले. लक्ष्मीनारायण कृषी सेवा केंद्राचे श्री. शेर्के व धुरी ऍग्रो चे राकेश धुरी यांनी कार्यक्रम पार पाडण्यात मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाला शिरोडा परिसरातील सत्तरहून जास्त शेतकरी तसेच सद्गुरू क्रॉप केअर चे राघो गावडे, कुडाळ शेतकरी संघाचे व्यवस्थापक श्री.कारीवडेकर , कणकवली शेतकरी संघाचे किशोर राऊत, माजी जि प.सदस्य कविटकर आदी उपस्थित होते. पीक पाहणी कार्यक्रमाला वीस हुन जास्त विक्रेते बंधूनी सहभाग नोंदवला.













