मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन झालंय. वयाच्या 89 व्या वर्षी बॉलिवूडच्या ‘ही-मॅन’नं जगाचा अखेरचा निरोप घेतला. तब्बल सहा दशकं बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. धर्मेंद्र यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळं त्यांना सोमवारी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती चिंताजनक होती. काही काळ त्यांना व्हेंटिलेटवरही ठेवण्यात आलेलं. पण, अखेर त्यांच्या निधनाची वृत्त समोर आलं आहे. त्यांच्या मृत्यूनं सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
धर्मेंद्र यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान, शाहरुख खान, गोविंदा, आमिषा पटेल यांसारख्या स्टार्सनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतलेली. तब्बल सहा दशकं हिंदी सिनेसृष्टीवर राज्य करणाऱ्या धर्मेंद्र यांची प्राणज्योत मालवली.












