कणकवली मच्छीमार्केटची नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवली येथील मच्छीमार्केटची प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी बाजारातील एकूण परिस्थितीचा आढावा घेत मच्छिविक्रेत्यांशी संवाद साधला. या पाहणीदरम्यान मच्छिविक्रेत्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या. विशेषतः पाणीपुरवठा, स्वच्छता आणि जागेच्या अडचणींबाबत विक्रेत्यांनी आपल्या अडचणी मांडल्या.

यावेळी नगराध्यक्ष श्री. पारकर यांनी मच्छिविक्रेत्यांना स्वच्छता राखण्याबाबत सूचना केल्या. बाजार परिसर स्वच्छ ठेवणे, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे आणि ग्राहकांसाठी स्वच्छ वातावरण निर्माण करणे यावर त्यांनी भर दिला. तसेच संबंधित समस्या लवकरात लवकर सोडवण्यासाठी आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिवाकर मुरकर यांच्यासह मच्छिविक्रेत्ये उपस्थित होते.