कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ओझरम मापारवाडी येथे ध्वजारोहण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शाळेच्या मुख्याध्यापिका आरती कांबळी मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वरूपा गावडे, ग्रामपंचायत सदस्या रूपाली धुरी, उपाध्यक्षा जागृती धुरी तसेच सदस्या प्रांजल खरात, निलेश बाणे, संजय धुरी, अक्षय धुरी, अंगणवाडी मदतनीस स्वाती तांबे आणि शिक्षक जाकीर शेख सर उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांना वार्षिक प्रगती पुस्तके मान्यवरांच्या हस्ते वितरित करून त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी पालकांना विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत तसेच शाळेच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती देण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या प्रगतीचा आलेख पाहून समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शाळेला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे वातावरण उत्साही व प्रेरणादायी होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक श्री. जाकीर शेख यांनी केले.













