मालवण (प्रतिनिधी) : डॅशिंग नेतृत्व, कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांना शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा मोठी जबाबदारी दिली आहे. ईशान्य मुंबई-दक्षिण मुंबई लोकसभा शिवसेना संपर्कप्रमुख पदी आमदार निलेश राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्यनेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार राज्यातील लोकसभा मतदारसंघात नियुक्ती
झाल्या आहेत. लोकसभेतील संसदीय गटनेते डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडे मुंबई व ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अन्य नियुक्तीही जाहीर झाल्या आहेत. कुडाळ मालवणचे कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांची ईशान्य मुंबई दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ शिवसेना संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना संघटनात्मक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची अशी ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. डॅशिंग नेतृत्व म्हणून ओळख असलेले निलेश राणे यांनी आपल्या कार्यतत्पर कामाचा ठसा विधिमंडळात उमटवला.
अभ्यासपूर्ण भाषणे तसेच प्रत्येक विषयाची मुद्देसूद व अभ्यासपूर्ण मांडणी करून त्यांनी सर्वच अधिवेशन गाजवली. मालवण कुडाळ मतदार संघाच्या गतिमान विकासासाठी व मोठा विकास निधी प्राप्त करण्यात आमदार निलेश राणे यशस्वी ठरले आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विविध निवडणुकांमध्ये त्यांना शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणूनही जबाबदारी देण्यात आली होती. शिवसेना पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या आमदार निलेश राणे यांना आता नव्याने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे शिवसेना ईशान्य मुंबई-दक्षिण मुंबई संपर्कप्रमुख पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.












