कणकवली (स्वप्नील तांबे): तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या वतीने शनिवार दिनांक २१ व रविवार दिनांक २२ मार्च २०२६ रोजी बौद्धाचार्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या दोन दिवसीय शिबिरामध्ये बौद्ध धर्मातील आचारसंहिता, गाथा पठण तसेच विविध संस्कार विधींबाबत सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे.
शनिवार, २१ मार्च रोजी सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत उद्घाटन व पूजापाठाने शिबिराची सुरुवात होईल. त्यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० दरम्यान सर्व गाथांचे सामुदायिक पठण करण्यात येईल. पुढे सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत बौद्धाचार्य यांच्या आचारसंहितेवर मार्गदर्शन होईल. दुपारी १.०० ते २.०० या वेळेत भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत संस्कार विधींचे प्रात्यक्षिक सत्र पार पडणार आहे.
रविवार, २२ मार्च रोजी सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत पूजापाठ होईल. त्यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत सामुदायिक गाथा पठण आयोजित करण्यात आले आहे. सकाळी ११.३० ते दुपारी १.०० या वेळेत पूजा साहित्य मांडणी व त्याबाबत माहिती देण्यात येईल. दुपारी १.०० ते २.०० भोजनानंतर दुपारी २.०० ते ४.०० या वेळेत संस्कार विधीसाठी आवश्यक गाथांबाबत मार्गदर्शन केले जाईल. शेवटी दुपारी २.०० ते ५.०० या वेळेत मनोगत व आभार प्रदर्शनाने शिबिराची सांगता होईल.
या शिबिराच्या माध्यमातून बौद्ध बांधवांना धार्मिक ज्ञान व संस्कार विधींचे प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.












