मंत्री नितेश राणेंनी दिल्या महेश सारंग यांना दिल्या वाढदिनी शुभेच्छा
सावंतवाडी (प्रतिनिधी) : भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा बँकेचे संचालक महेश सारंग यांचा 24 ऑक्टोबर रोजी वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसाचे औचित्य साधून पालकमंत्री नितेश राणे यांच्या कणकवली येथील निवासस्थानी जाऊन सारंग यांनी घेतली भेट घेतली. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी सारंग यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि होऊ घातलेल्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महेश सारंग यांनी मंत्री नितेश राणे यांचे आशीर्वाद घेतले. कोलगाव जिल्हा परिषद मतदार संघातून महेश सारंग मैदानात उतरणार आहेत.मागील निवडणुकीत अवघ्या काही मतांनी त्यांचा पराभव झाला होता. पण आता एकतर्फी विजय मिळवून सारंग यांना पराभवाचा हिशोब चुकता करायचा आहे. मंत्री नितेश राणेंची महेश सारंग यांना खंबीर साथ असून आता आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महेश सारंग सज्ज झाले आहेत.












