कणकवली (प्रतिनिधी) : शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास बेळणे येथील रमानंत व्हिलेज रिसॉर्ट समोर लक्झरी आणि ज्युपिटर स्कुटी मध्ये अपघात झाला. पुणेहून गोव्याच्या दिशेने जाणारी लक्झरी गाडी बेळणे येथे उभी होती. या उभ्या लक्झरी ला कणकवली च्या दिशेने जाणारा दुचाकीस्वार सूरज संतोष मुणगेकर या बेळणे वरचीवाडी येथे राहणाऱ्या 23 वर्षीय युवकाची लक्झरीच्या मागून धडक बसली. यात दुचाकीचे नुकसान झाले. तसेच सूरज यालाही दुखापत झाली.त्याच्यावर कणकवली येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. घटनास्थळी वाहतूक पोलीस हवालदार दिलीप पाटील, हवालदार मिलिंद देसाई, कॉन्स्टेबल तांबे, यांच्यासह हायवे ट्राफिक पोलीस उपनिरीक्षक संतोष राठोड, हवालदार ठाकूर तसेच सहकाऱ्यांनी धाव घेतली.












