कुडाळ-मालवण मतदारसंघात सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाचं औचित्य

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार वैभव नाईक यांचा गुरुवार, २६ मार्च रोजी वाढदिवस आहे. या निमित्ताने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांच्या वतीने संपूर्ण मतदारसंघात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:

संस्कृती आणि कला अविष्कार

शनिवार, २१ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजता मांडकुली येथे जंगी भजनाचा सामना रंगणार आहे.

बुधवार, २५ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता मालवण शहरात नेरूर येथील सुप्रसिद्ध ‘रोंबाट’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार, २५ मार्च रोजी रात्री ९ वाजता चिंदर सातेरी मंदिर येथे कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ, नेरूर यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे.

मंगळवार, २४ मार्च रोजी सकाळी ९ वाजता कणकवली येथील श्रीधर नाईक चौक येथे भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
बुधवार, २५ मार्च रोजी सकाळी १०:३० वाजता कुडाळ शहरात युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून रिक्षा सेनेच्या चालकांचा १ लाखाचा विमा उतरविण्यात येणार आहे.

वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच २६ मार्च रोजी अणाव येथील आनंदाश्रय येथे शिधा वाटप, तर झाराप येथील जीवदान विशेष शाळेत विद्यार्थ्यांना खाऊ व शिधा वाटप करण्यात येईल.

कुडाळ आणि आचरा विभागात पक्षाच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचा व चिंदर गावातील प्रतिष्ठित नागरिकांचा सत्कार सोहळा आयोजित केला आहे.

सरबत वाटपः २६ मार्च रोजी रामनवमी व वाढदिवसाच्या निमित्ताने माणगाव दत्तमंदिर येथे भाविकांना सरबत वाटप केले जाणार आहे.

या सर्व कार्यक्रमांच्या माध्यमातून वैभव नाईक यांचा वाढदिवस लोकोत्सवाच्या स्वरूपात साजरा करण्यासाठी शिवसैनिक मोठ्या उत्साहात तयारी करत आहेत.