सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हापरिषद सिंधुदुर्गच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडे कृषि व पशुसंवर्धन समिती, संतोष साटविलकर वित्त व बांधकाम सभापती, प्रितेश राऊळ शिक्षण व आरोग्य सभापती, अनुराधा नारकर महिला व बालविकास सभापती तर सहिता तांबे यांच्याकडे संजकल्याण सभापती समिती सुपूर्त. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत पदाधिकाऱ्यांना समितींच्या वाटपासह सर्व समित्यांवर समिती सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.












