अखेर आंबा काजू उत्पादक रस्त्यावर उतरले

कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू शेतकरी नांदगाव येथे महामार्ग रास्ता रोको साठी एकवटले. हे सर्व उत्पादक अखेर आता महामार्गावर उतरले असल्याने महामार्ग बंद झाला होता. आंबा काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्चा खाली करा अशी जोरदार घोषणा आंदोलकांनी सुरू केल्या. आंदोलनामध्ये माजी आमदार वैभव नाईक कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांच्यासह गणेश गावकर, किरण टेंबुलकर, प्रशांत शिंदे, गणेश वाळके, काका ढोके, राजू वाळके, तेजस मामघाडी, चंदन मामघाडी, विश्वास भुजबळ, राजेंद्र पाटील आधी सहभागी झाले आहे.