कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवली यांच्या पुढाकारातून कणकवली येथील बुद्ध विहार समोरील भव्य पटांगणातील धोकादायक ठरत असलेला महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा लाईट पोल अखेर हटविण्यात आला आहे.
या संदर्भात शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी वायरमन स्वप्नील तांबे यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर स्वप्नील तांबे यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी मा. ओमकार स्वामी तसेच लाईनमन राघोबा राऊळ यांच्याशी समन्वय साधत संबंधित पोल हटविण्याची विनंती केली होती.
सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि समन्वयातून आज बुद्ध विहार समोरील पटांगणातील हा पोल हटविण्यात आल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
या कामासाठी सहकार्य करणारे मा. ओमकार स्वामी, लाईनमन राघोबा राऊळ आणि वायरमन स्वप्नील तांबे यांचे कणकवली तालुका बौद्ध विकास संघ, मुंबई शाखा कणकवलीतर्फे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.












